ज्ञानवापीबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले, "ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."

ज्ञानवापी मशीदीत त्रिशुळ काय करतोय, असा सवाल देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
ज्ञानवापीबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले, "ज्ञानवापीला मशीद म्हणाल तर..."

देशभरात ज्ञानवापीवरुन वातावर तापताना दिसत आहे. यासाठी हिंदुत्ववादी गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे. असं असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे.

ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणार असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. ज्ञानवापीत अनेक देवतांच्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा हिंदुंनी ठेवलेल्या नाहीत. जर ज्ञानवापीला मशीद म्हणालात तर वाद होणारच आहे. तिथे त्रिशुळ काय करतोय, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारला यावर तोडगा काढायला आहे. मुस्लिम समाजाकडून जी ऐतिहासिक जूक झाली आहे. ती सोडवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे आलं पाहीजे, असं देखील ते म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबचं वक्तव्य केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in