"तुम्ही लोकांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली" राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले

राहुल यांनी सुरुवातीली अध्यक्षांचे आपल्याला लोकसभेत परत घेतल्याबद्दल आभार मानले.
"तुम्ही लोकांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केली" राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले

https://twitter.com/INCIndia/status/1689183480494596096मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. यानंतर विरोधी पक्षांकडून मोदी सरकार विरोधात संसदेत दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावार राहुल गांधी बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज अखेर अविश्वास प्रस्तावावर सुरु असलेलेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी बोलताना त्यांनी मणिपूर मुद्यावरुन केंद्र सरकारवर थेट टीका केली. पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर हे भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. मणिपुरचे दोन भागे केल गेले, असं म्हणत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला.

संसदेत भाषण करताना राहुल यांनी सुरुवातीली अध्यक्षांचे आपल्याला लोकसभेत परत घेतल्याबद्दल आभार मानले. यानंतर त्यांनी भाजपवर आपली तोफ डागली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "मागील वेळी मी जेव्हा अदानींवर बोललोल तेव्हा काही लोकांना त्रास झाला. यावेळी मी अगदी हृदयापासून बोलणार आहे."

मणिपूरच्या मुद्यावर ते म्हणाले की, मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान मात्र तेथे गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हे भारतात नाही. मणिपूर आता उरलेले नाही हेच मणिपूरचं सत्य आहे. तुम्ही त्याचे दोन भाग केले असून ते आता तुटलं आहे. मी मणिपूरमध्ये गेलो तेव्हा तिथल्या रिलीफ कॅम्पमध्ये बोललो. त्यावेळी एका महिलेने तिच्यासमोर तिच्यासमोर तिच्या एकुलत्या एक लहान मुलाला गोळ्या डोळ्यांसमोर गोळ्या घातल्याचं सांगितलं. ती महिला रात्रभर मुलाच्या मृतदेहासमोर पडून होती. यावेळी बोलताना त्यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली आहे, असं सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in