पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयातून पाटणच्या तरुणाला अटक

अभिजीत जुंबरे हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील युवकांच्या संपर्कात
पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयातून पाटणच्या तरुणाला अटक
Published on

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत संजय जंबुरे या युवकास ओदिशा सरकारच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. तो मूळचा पाटण तालुक्यातील विहे गावचा आहे.

अभिजीत जुंबरे हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील युवकांच्या संपर्कात होता. २०१८ साली तो पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील युवकाच्या संपर्कात आला. त्या युवकाचे आणि अभिजीतचे आर्थिक व्यवहार झाले. दरम्यान, पाकिस्तानच्या युवकाने त्याला पाकिस्तानी लष्कराच्या संपर्कात आणले. यातून अभिजीत पाकिस्तानला काही माहिती पुरवत असल्याचे समोर आले. याची माहिती मिळाल्यानंतर ओदिशाच्या स्पेशल टास्क फोर्सने अभिजीतच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्याला भुवनेश्वर येथे नेण्यात आले आहे.

अभिजीतच्या घरी चौकशी

ओदिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अभिजीत जंबुरे याला अटक केल्यानंतर मल्हारपेठच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अभिजीतच्या विहे येथील घरी येऊन चौकशी केली. त्याच्या घरी आई-वडील व बहीण असतात. अभिजीत हा अविवाहित आहे, तर वडील विहे बस थांब्यावर अनेक वर्षे सायकल दुरुस्तीचे दुकान चालवतात. अभिजीत गेल्या महिन्यात घरी आला होता.

logo
marathi.freepressjournal.in