यूट्यूबर ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरोधात २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. विकास सांस्कृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी राठी यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडीओविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण सुरू आहे.
यूट्यूबर ध्रुव राठी
यूट्यूबर ध्रुव राठी
Published on: 

नवी दिल्ली : यूट्यूबर ध्रुव राठी यांच्याविरोधात २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. विकास सांस्कृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी राठी यांच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडीओविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण सुरू आहे.

न्यायिक दंडाधिकारी अनाम रायस खान यांनी हे वॉरंट जारी केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार असून, न्यायालयाचा सविस्तर आदेश अद्याप प्रतीक्षेत आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने राठी यांच्याविरोधात नव्याने जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. १७ ऑक्टोबर रोजीही जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

यूट्यूबर ध्रुव राठी
Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या प्रक्रियाकाराला राठी यांचे घर बंद असल्याचे आढळले होते. त्यानंतर गुरुग्राम येथील पत्त्यावर नव्याने समन्स पाठवण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)