Video : आंध्रमध्ये 'कंडोम'वरून गोंधळ, चक्क प्रचारासाठी होतोय वापर; राजकीय पक्ष 'भिडले'

काही पक्षांकडून कंडोमच्या पाकिटवर पक्षाचं चिन्ह छापून ते लोकांना देण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयावर तुफान व्हायरल झाला आहे.
Condom Pocket Viral Video
Condom Pocket Viral VideoSocial Media
Published on

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देशासह राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केलीय. निवडणुका जिंकण्यासाठी प्रचार मोहिम राबवण्याची रणनीतीही काही पक्षांकडून आखली जात आहे. पण आंध्रप्रदेशमध्ये निवडणूक प्रचारासठी चक्क कंडोमचा वापर केल्याचं समोर आलं आहे. काही पक्षांकडून कंडोमच्या पाकिटवर पक्षाचं चिन्ह छापून ते लोकांना देण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, सत्ताधारी काँग्रेस पक्ष (YSR) आणि विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टी यांनी कंडोमच्या पाकिटवर पक्षाचं चिन्ह लावून ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवलं जात आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरा घरात पोहचून लोकसभा निवडणुकीसाठी कंडोमचा वापर करुन प्रचार मोहिम राबवत आहेत. पण दोन्ही पक्षांकडून प्रचार मोहिमेसाठी एकसारखीच पद्धत वापरली जात असल्याने दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी विरोधकांना धारेवर धरण्याचा प्रयत्नही केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलंय. कंडोमने ही मोहिम संपेल की, लोकांना वायग्राही दिला जाईल? असा थेट प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

त्यांना प्रत्युत्तर देत टीडीपी पार्टीकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये काँग्रेसचा (YSRCP) लोगो लावण्यात आला आहे.

तसंच त्यांनी विरोधी पक्षाला सवाल करत विचारलं आहे की, निवडणुकीसाठी हाच तुमचा निर्धार आहे का?

logo
marathi.freepressjournal.in