कर्नाटकात आढळला झिका व्हायरस ; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ठिकठिकाणच्या डासांमध्ये झिका व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.
कर्नाटकात आढळला झिका व्हायरस ; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

कर्नाटकात झिका व्हायरस आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. बंगळुरु शहराजवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात डासांमध्ये धोकादायक झिका व्हायरस आढळून आला आहे. त्यानंतर कर्नाटक आरोग्य विभाग सतर्क झाला असून याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ठिकठिकाणच्या डासांमध्ये झिका व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.

चिक्काबल्लापूर जिल्ह्यातून ६ लोकांच्या चाचणी करण्यात आली होती. त्यात ५ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शिडलाघट्टा तालुक्यातील तलकायालाबेट्टा गावातून एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. झिका व्हायरस आढळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

चिक्काबल्लापूरचे डीएचओ डॉ. महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसारि १७ ऑक्टोबर रोजी डासांमध्ये झिका व्हायरस आढळला होता. मात्र, मानवी रक्ताच्या नमुन्यांमध्ये तो अद्याप आढळलेला नाही. हा व्हायरस माणसांमध्ये झपाट्याने पसरतो. त्यासाठी मानवी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. व्हायरसबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in