ZIM vs SA, ICC T20 WC26 : शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वे उत्सुक; दक्षिण आफ्रिकेशी आज अखेरची लढत

गटसाखळीत दमदार कामगिरी केल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ सुपर-८ फेरीत पुरता ढेपाळला. आता टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ उत्सुक असेल.
ZIM vs SA, ICC T20 WC26 : शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वे उत्सुक; दक्षिण आफ्रिकेशी आज अखेरची लढत
ZIM vs SA, ICC T20 WC26 : शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वे उत्सुक; दक्षिण आफ्रिकेशी आज अखेरची लढत
Published on

नवी दिल्ली: गटसाखळीत दमदार कामगिरी केल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ सुपर-८ फेरीत पुरता ढेपाळला. आता टी-२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणाऱ्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ उत्सुक असेल.

सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झिम्बाब्वेने साखळी फेरीत गटात अग्रस्थान पटकावत थाटात सुपर-८ फेरीत प्रवेश केला होता. मात्र वेस्ट इंडिज आणि नंतर भारताकडून पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), डेव्हिड मिलर, क्विंटन डीकॉक, केशव महाराज, आनरिख नॉर्किए, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, जॉर्ज लिंडे, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बोश, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, जेसन स्मिथ, मार्को यान्सेन, क्वेना मफाका.

झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीमी क्रीमर, बेन करन, ब्रेड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोतेंदा मापोसा, ताडिवानाशी मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, टॉनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझराबानी, डायन मेयर्स, रिचर्ड एनगरावा.

सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.

logo
marathi.freepressjournal.in