Video : पेट्रोल न मिळाल्याने पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला; Zomatoच्या डिलिवरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ हैदराबादच्या चंचलगुडा भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
Video : पेट्रोल न मिळाल्याने पठ्ठ्या थेट घोड्यावर निघाला; Zomatoच्या डिलिवरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

कारणे देणारे कारणे देतात आणि काम करणारे काम फत्ते करतात. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात एक झोमॅटोचा डिलिवरी बॉय थेट घोड्यावर स्वार होत ऑर्डर पोहच करायला जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ हैदराबादच्या चंचलगुडा भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

'हिट अँड रन' कायद्याच्या विरोधात ट्रक चाकलकांनी आंदोलन पुकारल्याने देशभरातील पेट्रोल पंपावर इंधनासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हैदराबादमध्ये देखील मंगळवारी पेट्रोल पंपावर मोठी रांग लागली होती. यात हा डिलिवरी बॉय देखील अडकला होता. बराच वेळ उभा राहूनही त्याला पेट्रोल न मिळाल्याने त्याने त्याची बाईक तिथेच सोडली आणि घोड्यावर स्वार होत ऑर्डर पोहच करायला निघाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in