झोमॅटोकडून हिरवा गणवेश रद्द

आम्ही शाकाहारी लोकांसाठी एक तुकडी सुरू ठेवणार आहोत. मात्र, त्यासाठी वेगळा रंग वापरण्याचा निर्णय आम्ही रद्द केला आहे.
झोमॅटोकडून हिरवा गणवेश रद्द

नवी दिल्ली : शाकाहारी अन्न वितरण सेवेसाठी वेगळ्या हिरव्या गणवेशाच्या योजनेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर कंपनी ही योजना मागे घेत असल्याचे झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपंदर गोयल यांनी बुधवारी जाहीर केले. तसेच कंपनी सध्याचा लाल गणवेशच सुरू ठेवत असल्याचेही स्पष्ट केले.

आम्ही शाकाहारी लोकांसाठी एक तुकडी सुरू ठेवणार आहोत. मात्र, त्यासाठी वेगळा रंग वापरण्याचा निर्णय आम्ही रद्द केला आहे. आमचे सर्व रायडर्स लाल रंगाचे गणवेश परिधान करतील. परंतु झोमॅटो ॲपवर त्यांचा वेगळा रंग दर्शविला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in