झुबीन गर्गची हत्याच; आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा दावा

गायक आणि अभिनेता झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नव्हती, तर झुबीन गर्गची हत्या करण्यात आली, असा धक्काजदायक खुलासा मंगळवारी आसाम विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला.
झुबीन गर्गची हत्याच; आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा दावा
झुबीन गर्गची हत्याच; आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचा दावा
Published on

गुवाहाटी : गायक आणि अभिनेता झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नव्हती, तर झुबीन गर्गची हत्या करण्यात आली, असा धक्काजदायक खुलासा मंगळवारी आसाम विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला. विरोधी पक्षाने झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्याचवेळी एक स्थगन प्रस्तावही आणण्यात आला. यानंतर याबाबत उत्तर देताना सरमा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. तपासकर्त्यांच्या हाती नवे पुरावे लागले आहेत, असेही सरमा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने चालला आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांना शिक्षा केली जाईल. आम्ही सरकार म्हणून कुणाचाही बचाव करणार नाही. गायक आणि अभिनेता झुबीन गर्गचा मृत्यू १९ सप्टेंबरला झाला. सिंगापूरला रहस्यमय स्थितीत त्याचा मृत्यू झाला. ‘नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हल’मध्ये भाग घेण्यासाठी झुबीन गर्ग गेले होते, त्यावेळी ही घटना घडली.

झुबीन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना मृत्यू झाला. यानंतर ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’चे (एनईआयएफ) मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीन यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचे चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांना बुधवारी कामरूपच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवले.

logo
marathi.freepressjournal.in