नवी मुंबईतील डॉक्टरची १.३ कोटींची फसवणूक; क्रिप्टोकरन्सीच्या भूलभुलैयात अडकले

नवी मुंबईतील डॉक्टरची १.३ कोटींची फसवणूक; क्रिप्टोकरन्सीच्या भूलभुलैयात अडकले

या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : नवी मुंबईतील एका डॉक्टरला १.३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतविण्यास आकर्षित करून त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय घटनेतील फसवणुकीच्या गुन्ह्यासंबंधातील कलमे या गुन्हेगारांवर लावण्यात आली आहे, असे सायबर पोलिसांनी सांगितले. या प्रकरमात आरोपींनी सानपाडा येथील डॉक्टरला गळाला लावले असून एप्रिल व जून २०२३ दरम्यान विविध प्रसंगी त्याच्याशी आरोपींनी संपर्क साधून त्याला भुलविले आणि १.३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगमध्ये लावण्यास सांगून त्याची लूट केली.

या गुंतवणुकीतून काहीच पदरात पडले नसल्याने डॉक्टराने या संबंधात विचारणा केली तेव्हा आरोपींनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे या प्रकरणी त्याने पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in