Navi Mumbai : १७ वर्षीय मुलीची निघृण हत्या

तळोजा फेज-२ येथील असावरी हाऊसिंग सोसायटीत घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे. १७ वर्षीय तमन्ना मोफीजुल शेख हिची तिच्याच नातेवाईकाकडून निघृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
Navi Mumbai : १७ वर्षीय मुलीची निघृण हत्या
Published on

नवी मुंबई : तळोजा फेज-२ येथील असावरी हाऊसिंग सोसायटीत घडलेल्या भीषण घटनेने परिसर हादरला आहे. १७ वर्षीय तमन्ना मोफीजुल शेख हिची तिच्याच नातेवाईकाकडून निघृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मोहम्मद अयुब शाहीद मिस्त्री (४४) याला उल्हासनगर येथून अटक केली.

तमन्ना आपल्या आईसोबत राहत होती. आरोपी हा तमन्नाच्या मावशीचा पती असून मुळचा पश्चिम बंगालमधील आहे. सध्या तो उल्हासनगर कॅम्प-५ येथे राहून जीन्स तयार करणाऱ्या कारखान्यात काम करत होता. मोहम्मद अयुब याला तमन्नाचे लग्न आपल्या मुलासोबत व्हावे, अशी इच्छा होती. शुक्रवारी सकाळी तमन्नाची आई कामावर गेल्यानंतर आरोपी तिच्याशी बोलण्यासाठी आला असता त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अयुबने प्रेशर कुकरने डोक्यावर वार केला आणि नंतर धारदार सुरीने भोसकून हत्या केली.

logo
marathi.freepressjournal.in