आमिष दाखवून २ कोटी ९७ लाखांची फसवणूक

टोळीने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी २० गुंतवणूकदारांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन त्यांची तब्बल २ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
आमिष दाखवून २ कोटी ९७ लाखांची फसवणूक

नवी मुंबई : विविध गुंतवणूक योजनांमध्ये जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने अनेक लोकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांपैकी २० गुंतवणूकदारांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन त्यांची तब्बल २ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध सानपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमेश यादव, कुणाल देवडा, विशाल रवानी, कुंजलबेन पटेल, चंचल विशाल रवानी, केशमा यादव, अश्रफ बागवान, उमेश पटेल, अर्चना देवडा या नऊ जणांचा समावेश आहे. या टोळीने २०२१ मध्ये जास्तीचा परतावा देणाऱ्या विविध गुंतवणुकीच्या योजना सुरू केल्या होत्या. त्यावेळी या टोळी वाशीतील हॉटेलमध्ये एक सेमिनार घेऊन जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. तसेच गुंतवणुकदारांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. या टोळीने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून शेकडो लोकांनी या टोळीने सुरू केलेल्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in