२०० कोटींचे अमली पदार्थ जप्त; ४ अटकेत; NCB ची कारवाई; ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

नवी मुंबईत मोठी कारवाई करत अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) २०० कोटी रुपयांचे बेकायदेशीर अमली पदार्थ जप्त करून मोठे ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त केले आहे.
२०० कोटींचे अमली पदार्थ जप्त; ४ अटकेत; NCB ची कारवाई; ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त
Published on

मुंबई : नवी मुंबईत मोठी कारवाई करत अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) २०० कोटी रुपयांचे बेकायदेशीर अमली पदार्थ जप्त करून मोठे ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

एनसीबीच्या मुंबई विभागाने (NCB MZU) गेल्या आठवड्यात जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये ११.५४ किलो उच्च दर्जाची कोकेन, ४.९ किलो हायब्रिड प्रकारचे हायड्रोपोनिक गांजा, ५.५ किलो वजनाच्या २०० कॅनाबिस गम्मीज (गांजापासून बनवलेले गोड पदार्थ) यांचा समावेश आहे.

एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले की, हे ड्रग्ज सिंडिकेट परदेशातून चालवले जात होते. यातील काही अमली पदार्थ अमेरिकेतून कोरिअर, लहान मालवाहू सेवा आणि मानवी वाहतूकदारांद्वारे भारतात आणण्यात आले होते.

एनसीबीने मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाला पाठवण्यासाठी असलेले २०० ग्रॅम कोकेन असलेले पार्सल जप्त केले. त्यानंतर तपास करत नवी मुंबईतील सिंडिकेटचा माग काढण्यातआला आणि ही मोठी कारवाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in