नवी मुंबई महानगरपालिकेचा ३२ वा वर्धापन दिन जल्लोषात

या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात नामवंतांची भाषणे प्रशासनतर्फे प्रगती वाटचालीची माहिती दिली गेली तर दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले गेले.
नवी मुंबई महानगरपालिकेचा ३२ वा वर्धापन दिन जल्लोषात
Published on

नवी मुंबई : सोमवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई मनपाचा ३२ वा वर्धापन दिन जल्लोषात पार पडला. यावेळी नवी मुंबई उभारणीत लोकप्रतिनिधी अधिकारी ते सामान्य जनता या सर्वांचा हातभार लागला आहे, असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले. तर नवी मुंबई मनपाचे अनेक प्रकल्प हे इतर पालिकांसाठी दिशादर्शक ठरले आहेत. त्यामुळे सुरवातीपासून आपले वेगळेपण या मनपाने जपले आहे. असे प्रशंसोत्गार आमदार मंदा म्हात्रे यांनी काढले. तसेच आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईतील नागरिक जागृत असल्याचे सांगत वर्षभरातील राज्य व राष्ट्रीय मिळालेल्या पुरस्काराची माहिती त्यांनी दिली. १७ डिसेंबर १९९१ मध्ये नवी मुंबई ही ग्रामपंचायतची थेट महानगर पालिका करण्याचा निर्णय घेतला गेला तर १ जानेवारी १९९२ ला प्रत्यक्षात मनपाचा कारभार सुरू झाला. याला आज तब्बल ३२ वर्ष झाली आहे. या निमित्ताने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जोरदार वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात नामवंतांची भाषणे प्रशासनतर्फे प्रगती वाटचालीची माहिती दिली गेली तर दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले गेले.

logo
marathi.freepressjournal.in