शरद मोहोळ खूनप्रकरणी ६ आरोपींना पनवेलमधून अटक

आरोपींचा शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर पनवेल पोलिसांनी या आरोपींना अटक केली
शरद मोहोळ खूनप्रकरणी ६ आरोपींना पनवेलमधून अटक

नवी मुंबई : पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा संशयीत आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी रविवारी रात्री पनवेलमधील एका फार्महाऊसवर छापा टाकून अटक केली आहे.

तसेच त्यांना पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. या आरोपींचा शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर पनवेल पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.

संशयित आरोपींमध्ये रामदास नानासाहेब मारणे (३६), मोहन मारुती पांगरे (३६), विठ्ठल महादेव शेलार (३६) व त्यांच्या सोबत असलेले पंकज सुखदेव पाटील (३२), अमित तळाराम भाटी (२६) व राजेंद्र शिवाजी पारखे (३०) या सहा जणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते.

logo
marathi.freepressjournal.in