नवी मुंबईत रक्तदान शिबिरात ६५ पिशव्या रक्त जमा

केमिस्ट ब्लड सेंटर या रक्तपेढीच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या शिबिरात ६५ दात्यांकडून रक्त संकलन करण्यात आले.
नवी मुंबईत रक्तदान शिबिरात ६५ पिशव्या रक्त जमा

नवी मुंबई : शिवसेनेचे नवी मुंबई उपशहरप्रमुख तथा नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीचे माजी सदस्य समीर बागवान आणि संस्कार फाऊंडेशनच्या वतीने सीवूडमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान उपक्रमात रविवारी नेरूळ-सीवुडवासीयांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. केमिस्ट ब्लड सेंटर या रक्तपेढीच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या शिबिरात ६५ दात्यांकडून रक्त संकलन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना सीवुड्सच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी, प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रक्तदान मोहिमेद्वारे समाजाप्रती असलेली नागरिकांची भावना उद्दिपीत करण्याचे काम करण्यात आले. सीवुड्स सेक्टर ४२ ए येथील मातृमीलन विकास केंद्रामध्ये रविवारी सकाळी १० ते ३ या कालावधीत हे शिबीर राबवण्यात आले. या कार्यक्रमाला सानपाडा येथील केमिस्ट भवनचे नलावडे, सुनील छाजेड आणि मधुकर गावडे ह्यांचे सहकार्य मिळाले. या शिबिराला नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख सुमित्र कडु, शिवदूत चाँद पटेल, सामाजिक कार्यकर्त्यां फुलन शिंदे यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे त्याचप्रमाणे आयोजकांचे मनोबल वाढवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in