नवी मुंबईतील शाळांना सात दिवसांची सुट्टी मनसेच्या पुढाकारामुळे उत्साहाचे वातावरण

मागील जवळपास १२ वर्षांपासून दरवर्षी गणेशोत्सवाला सुट्टी देण्यात येत असल्याचे पुराव्यासह पटवून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना सात दिवसांची सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले.
Ganpati Murti
ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन
Published on

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे नवी मुंबईतील सर्व शाळांना गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थी ते गौरी-गणपती विसर्जनापर्यंत सुट्टी दिली जाते. गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी गणपती सुट्टीसंदर्भात महापालिका शिक्षण विभागाकडून अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक पालक हे संभ्रमात होते. याप्रकरणी मनसेने पुढाकार घेऊन पालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेतली. मागील जवळपास १२ वर्षांपासून दरवर्षी गणेशोत्सवाला सुट्टी देण्यात येत असल्याचे पुराव्यासह पटवून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना सात दिवसांची सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नवी मुंबईतील सीबीएसई/आयसीएसई/सरकारी/ खासगी अशा सर्व शाळांना सात ०७ ते १४ सप्टेंबरपर्यंत सुट्टी घोषित करत असल्याचे पत्र पालिकेच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आले. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे.

अशा वेळी महानगरपालिका शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर न केल्याने काही मुजोर शाळा याचा गैरफायदा घेतात हे दुर्दैवी आहे, असे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले. सात दिवस सुट्टी मिळाल्याने पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

logo
marathi.freepressjournal.in