उरणमध्ये लवकरच साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; १५ हून अधिक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित; एकूण ८२. ५४ कोटी रुपये खर्च

उरण येथे १०० खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेली १५ हून अधिक वर्षे...
उरणमध्ये लवकरच साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; १५ हून अधिक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित; एकूण ८२. ५४ कोटी रुपये खर्च
(प्रातिनिधिक छायाचित्र)

पनवेल : उरण येथे १०० खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेली १५ हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. या कामासाठी एकूण ८२. ५४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून तशी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

उद्योग, वाहतूक, आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उरणमध्ये सर्वसुविधायुक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याची मागणी कार्यक्षम आमदार महेश बालदी यांनी सरकार दरबारी केली होती. उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी २०१८ साली फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मान्यता मिळाली होती. मात्र राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर सन २०२२ पर्यंत या कामाला मुहूर्त लागला नाही आणि हा प्रश्न प्रलंबितच राहिला होता. मात्र आमदार महेश बालदी यांनी आपले प्रयत्न कायम ठेवले. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतल्या आणि हा प्रश्न सुटण्याला वेग आला. आणि त्या अनुषंगाने आता उपजिल्हा रुग्णालय व वसतिगृह बांधण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या ८४.५४ कोटी निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in