अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

कंपनीच्या वाहनाने कामोठे येथील एमजीएम ‌रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
अज्ञात वाहनाच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नवी मुंबई : पनवेलमधील चिखले येथे रस्त्याचे काम सुरू असून तेथील काम करणाऱ्या मजुराच्या मुलाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुलाचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या अपघातातील मृत मुलाचे नाव अशोक आदिवासी असे असून तो मूळचा मध्यप्रदेश राज्यातील आहे. अशोकचे आईवडील व त्याचे भावंडे रस्ता तयार करण्याच्या ठिकाणी लेबरचे काम करत असल्याने ते गत डिसेंबर महिन्यापासून मध्य प्रदेश येथून पनवेलमधील चिखले येथे कामासाठी आले होते. सध्या ते टिआयपीएल या कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. तसेच ते त्याचठिकाणी तात्पुरत्या झोपडीत राहत होते. ९ जानेवारी रोजी रात्री अशोक व त्याचे कुटुंबीय रात्रीचे जेवण करून झोपले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अशोक हा उसर्ली रोडच्या दिशेने शौचालय करण्यासाठी गेला होता. अशोकच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सदर ठिकाणी धाव घेतली. यावेळी त्याठिकाणी अशोक आदिवासी हा गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर जखमी अशोकला कंपनीच्या वाहनाने कामोठे येथील एमजीएम ‌रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in