मुस्लीम असूनही हिंदू नावाने वावरणारे बांगलादेशी दाम्पत्य अटकेत

मागील चार वर्षांपासून हे बांगलादेशी दाम्पत्य आपली खरी ओळख लपवून पनवेल भागात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे उघडकीस आले
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

नवी मुंबई : बांगलादेशी नागरिक असल्याची व मुस्लीम असल्याची ओळख लपविण्यासाठी एका बांगलादेशी दाम्पत्याने आपले मुस्लीम नाव बदलून हिंदू नावाचे बनावट भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबूक बनवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. दशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने या दोघांची धरपकड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे मागील चार वर्षांपासून हे बांगलादेशी दाम्पत्य आपली खरी ओळख लपवून पनवेल भागात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे उघडकीस आले आहे. दशतवादविरोधी पथकाने या दोघांनी तयार करून घेतलेले भारतातील बनावट कागदपत्रे जप्त करून दोघांना अटक केली आहे

पनवेल तालुक्यातील कोलवाडी भागातील पोपेटा बिल्डिंगमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलीस निरीक्षक तुकाराम नलावडे, पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड, विजयकुमार पाटील व त्यांच्या पथकाने पनवेल तालुक्यातील कोलवाडीमधील पोपेटा बिल्डिंगमधील एका घरावर छापा मारला होता.

त्यानंतर पोलिसांनी सदर घरामध्ये राहत असलेल्या रंजन सत्यरंजन दास उर्फ अस्लम कुडुस शेख (३५) याच्याकडे चौकशी केली असता, तो व त्याची पत्नी हुसना अस्लम शेख उर्फ मलिना रंजन दास (३४) या दोघांनी २०१५ मध्ये बांगलादेशातील गरीबीस कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच या दोघांनी भारतामध्ये काम मिळविण्यासाठी मुस्लीम असल्याची ओळख लपवून हिंदू नावाने बनावट आधारकार्ड, बँकेचे पासबूक आदी कागदपत्रे बनवून घेतल्याची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in