चोरट्याच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

सेक्टर-१९ मधील एका घरामध्ये चोरी करण्यासाठी घुसला असता घरामध्ये झोपलेल्या दाम्पत्यानी चोरटया दिनेशला पकडले.
चोरट्याच्या मृत्यूप्रकरणी तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या कोठडीत झालेला चोरट्याचा मृत्यू, रात्र पाळीवर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी तीन पोलिसांविरोधात सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गत वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्यात ही घटना घडली होती. या प्रकरणातील मृत दिनेश देवराज चव्हाण (२५ ) हा चोरटा गत १३ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील एका घरामध्ये चोरी करण्यासाठी घुसला असता घरामध्ये झोपलेल्या दाम्पत्यानी चोरटया दिनेशला पकडले. रहिवाशांनी दिनेशला चोप दिल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर दिनेश चव्हाण हा अचानक अत्यवस्थ झाल्याने त्याचा ठिकाणी मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in