लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

पीडित तरुणीने गत आठवड्यात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

नवी मुंबई : महापे येथील मिलेनीयम बिझनेस पार्कमध्ये कॉल सेंटर चालवणाऱ्या एका व्यक्तीने कॉल सेंटरमध्ये कामाला असलेल्या २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर कॉल सेंटरमध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उफेज शेख (३३) असे या आरोपीचे नाव असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील पीडित तरुणी मुंब्रा परिसरात राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी उफेज शेख हा शिळफाटा येथे राहण्यास आहे. पीडित तरुणी वर्षभरापूर्वी आरोपी उफेज शेख याच्या महापे मिलेनियम बिझनेस पार्क येथील कॉल सेंटरमध्ये काम करत होती. या कालावधीत आरोपी उफेज शेख याने पीडित तरुणीसोबत जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत ऑक्टोबर २०२३ मध्ये कॉल सेंटरमध्ये, पीडित तरुणीच्या घरात तसेच स्वत:च्या घरात व इतर ठिकाणी पीडित तरुणीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

मात्र त्यांनतर आरोपी उफेज शेख याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने गत आठवड्यात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी आरोपी उफेज शेखविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासासाठी तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in