द्राक्षांची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

नाशिक येथून द्राक्षे घेऊन जेएनपीटी बंदरात निघालेला कंटेनर ट्रेलर महापे येथील एलटी पुलाखाली रस्त्यावर पडला...
द्राक्षांची वाहतूक करणारा कंटेनर उलटला

नवी मुंबई : नाशिक येथून द्राक्षे घेऊन जेएनपीटी बंदरात निघालेला कंटेनर ट्रेलर महापे येथील एलटी पुलाखाली गुरुवारी सकाळी रस्त्यावर पडल्याने या मार्गावर ऐन सकाळच्यावेळी वाहतूककोंडी झाली होती. महापे वाहतूक शाखेने चार हायड्रा क्रेनच्या सहाय्याने अथक प्रयत्नानंतर रस्त्यावर पडलेला हा कंटेनर बाजूला काढून दुपारच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकारामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शिळफाटा-महापे मार्गे नवी मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

नाशिक येथून जेएनपीटी बंदरात २३ टन द्राक्ष घेऊन निघाला होता. गुरुवारी सकाळच्या दरम्यान सदर कंटेनर शिळफाटा महापे मार्गावरील एलटी ब्रीजजवळ आला असताना, सदर कंटनेर रस्त्यावर पलटी झाला. या प्रकारामुळे ऐन सकाळच्या सुमारास या मार्गावर वाहतूककोंडी झाली. यावेळी महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. सय्यद व त्यांच्या अंमलदारांनी उड्डाणपुलावरून वाहतूक वळवून वाहतूककोंडी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर वाहतूक पोलिसांनी दोन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेला कंटनेर उचलून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी क्रेन तुटल्याने ट्रेलरमधून कंटेनर खाली पडला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी चार हायड्रा क्रेन मागवून रस्त्यावर पडलेला २३ टन द्राक्षाने भरलेला कंटेनर बाजूला काढला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. या प्रकारामुळे शिळफाटा महापे मार्गावर सुमारे पाच तास वाहतूककोंडीसदृश परिस्थिती निर्माण होऊन संथ गतीने वाहतूक सुरू होती. याचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in