हार्बर रेल्वे मार्गावर मोबाईल फोन खेचणाऱ्या लुटारूंचा सुळसुळाट

वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर मोबाईल फोन खेचणाऱ्या लुटारूंचा सुळसुळाट

नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर मोबाईल फोन खेचण्याचे प्रकार सुरूच असून सदर लुटारूंनी मागील तीन दिवसांमध्ये दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन खेचून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

तुर्भे स्टोअर्स येथे राहणारा सूरज गुप्ता (२०) या तरुणाने नेरूळ रेल्वे स्थानकातून ठाणे लोकल पकडली होती. यावेळी सदर लोकल ठाण्याच्या दिशेने निघाली असताना, फलाटावर उभ्या असलेल्या एका लुटारूने सुरजच्या हातातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून पलायन केले.

त्यानंतर तुर्भे सेक्टर-२२ मध्ये राहणारी पूजा शर्मा (२५) या तरुणीने सानपाडा येथून पनवेल लोकल पकडली होती. यावेळी पूजा जनरल डब्यात उभी असतानाच सदर लोकलमध्ये असलेल्या एका लुटारूने लोकल सुरू होताच पूजाच्या हातातील सुमारे ३३ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून पलायन केले. वाशी रेल्वे पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in