नवी मुंबईतील उलवे वहाळ परिसरात साचलेल्या पाण्यात अडकली शाळेची बस

एक शाळेची बस अडकून पडली. बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
नवी मुंबईतील उलवे वहाळ परिसरात साचलेल्या पाण्यात अडकली शाळेची बस

रविवारपासून सुरु असलेल्या पावसाने आपला जोर मंगळवारी देखील कायम ठेवला. मंगळवार ५ जुलै रोजी पहाटेपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाच्या माऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी पाणी साचण्याच्या, वाहतूककोंडीच्या घटना घडल्या. अशातच शाळेसाठी निघालेले विद्यार्थीही पावसाच्या पाण्यात अडकल्याचे चित्र नवी मुंबईतील उलवे वहाळ येथे पाहायला मिळाले. वहाळ येथील काहीअंशी रस्त्याचे काम सुरु आहे. याठिकाणी खड्डे आणि शेजारीच नाला असल्याने मुसळधार पावसामुळे हे नाले पूर्णपणे भरत रस्त्यावर देखील गुडघ्याएवढे पाणी साचले. याच पाण्यात सकाळच्या सुमारास एक शाळेची बस अडकून पडली.

बसमधील विद्यार्थी घाबरल्याने स्थानिक नागरिकांनी तसेच अन्य वाहनचालकांनी या बस ला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही बस मुख्य रस्त्यावर सुखरूप आणण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in