आयुक्तालयासमोरच महिलेचे दागिने लुटले

सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
आयुक्तालयासमोरच महिलेचे दागिने लुटले

नवी मुंबई : चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी रविवारी सकाळी सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर वॉक करणाऱ्या एका ६७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

सीबीडी बेलापूर येथील सुहासिनी देसाई (६७) या रविवारी सकाळच्या सुमारास शिवाजी चौक ते आग्रोळी गाव तलाव या रोडला वॉकसाठी गेल्या होत्या. त्यानंतर सकाळच्या सुमारास त्या पोलीस आयुक्तालयाच्या समोरून पायी चालत जात असताना, पार्क हॉटेलसमोरील नर्सरीजवळ त्यांच्या समोरून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने सुहासिनी देसाई यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. यावेळी सुहासिनी देसाई यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत दोघे लुटारू पसार झाले. या घटनेनंतर त्यांनी सीबीडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in