अश्वमेध यज्ञासाठी आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू

या अपघातात रिक्षामधील पाचहीजण जखमी झाले. त्यामुळे या सर्वांना एम.जी.एम. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले
अश्वमेध यज्ञासाठी आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू

नवी मुंबई : भिवंडी येथून खारघर येथील अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांच्या रिक्षाला अपघात झाल्याने रिक्षामधील ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, तर रिक्षातील मृत मुलाचे आई वडिल व इतर दोघे असे चौघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सदरचा अपघात रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळून आल्याने खारघर पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव दिव्यप्रसाद घनशाम नायक असे असून, जखमी झालेल्यांमध्ये दिव्य प्रसादाचे वडील घनशाम नायक, आई मंजुता नायक त्यांचे शेजारी ऋषीकेश दुबे व त्यांची पत्नी या चौघांचा समावेश आहे. त्यांनी खारघर रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी रिक्षा केली होती. यावेळी त्यांची रिक्षा भरधाव वेगाने जात असताना, पेठपाडा मेट्रो स्टेशन जवळ रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकुन पलटी झाली.

या अपघातात रिक्षामधील पाचहीजण जखमी झाले. त्यामुळे या सर्वांना एम.जी.एम. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र त्यापैकी दिव्यप्रसाद नायक या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील रिक्षा चालक सतीश मारुती उत्तेकर (२८) याने निष्काळजीपणे, धोकादायकरित्या रिक्षा चालवून नेल्याने सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in