गोमांसाची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी ५८ लाख रुपये किंमतीचे मांस जप्त

कोल्ड स्टोरेजचे मालक व मॅनेजर या दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियमासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली
गोमांसाची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी ५८ लाख रुपये किंमतीचे मांस जप्त
Published on

तळोजा एमआयडीसीतील सीबा इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेजवर पोलिसांनी गत जुन महिन्यात छापा मारुन तब्बल १ कोटी ५८ लाख रुपये किंमतीचे जनावरांचे मांस जप्त केले होते. या कारवाईत जप्त करण्यात आलेले मांस हे गोवंश जनावरांचे असल्याचे कलिना न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत आढळुन आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी सदर कोल्ड स्टोरेजचे मालक व मॅनेजर या दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियमासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गत १४जुन रोजी सायंकाळी तुर्भे एमआयडीसी व तळोजा पोलीस ठाण्यातील पथकाने संयुक्तरित्या तळोजा एमआयडीसीतील सीबा इंटरनॅशनल कोल्ड स्टोरेजवर छापा मारला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांना सदर कोल्ड स्टोरेजमध्ये जनावरांच्या मासांने भरलेले दोन रेफ्रिजरेटर कंटेनर आढळुन आले होते.

सदरचे मांस हे कोणत्या जनावरांचे आहे, याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदर मांसाचे ११वेगवेगळे नमुने ताब्यात घेऊन ते कलिना येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते.

logo
marathi.freepressjournal.in