कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून ८६० वाहनांवर कारवाई; वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा मोहीम

वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती त्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे रिक्षा युनियन चालक-मालक संघटना, स्कूलबस चालक-मालक संघटना यांच्या देखील बैठका घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली.
कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून ८६० वाहनांवर कारवाई; वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा मोहीम

नवी मुंबई : कोपरखैरणे वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा या मोहिमेंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाविरोधात विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ८६० वाहनांवर कारवाई केली. त्याशिवाय वाहतूक पोलिसांनी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये, रिक्षा चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर देखील कारवाई केली.

नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम पाळा आणि दंड टाळा या मोहिमेअंतर्गत १ ते १५ मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक पोलिसांनी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन त्यांना व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले.

तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती त्यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे रिक्षा युनियन चालक-मालक संघटना, स्कूलबस चालक-मालक संघटना यांच्या देखील बैठका घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच प्रत्येक सिग्नलवर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्याबरोबरच बेशिस्त वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ८६० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

अशा प्रकारची कारवाई

  • सिग्नल जम्पिंग ०६

  • मोबाईल संभाषण करणे १०

  • रिक्षातून ज्यादा पॅसेंजर वाहतूक ५७

  • मद्यप्राशन करून वाहन चालवणे १०

  • विनाहेल्मेट दुचाकी चालव २४८

  • अनधिकृत वाहन पार्क कर २९८

  • विरुद्ध दिशेने वाहन चालव ०५

  • फुटपाथवरून वाहने चालवणे ११२

  • स्टॉप लाईनवर वाहने न थांबवणेö ३८

  • एकूण वाहने ८६०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in