अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून ॲड. स्मिता धुमाळ-पाटील यांनी काम पाहीले. सुनावणीदरम्यान १३ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. याप्रकरणी आरोपीला दोषी पकडून तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अलिबाग : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. केवीन सतीश म्हात्रे असे शिक्षा सुनवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरचा गुन्हा अलिबाग तालुक्यातील किहीम २२ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता. पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेतून घरी चालली होती. यावेळी आरोपी मोटारसायकल घेऊन आला आणि मुलींसमोर विकृत चाळे करू लागला.

१८ आणि २१ जानेवारी २०२२ ला पुन्हा त्याने पीडित मुलगी आणि मैत्रिणींसमोर विकृत चाळे करत अश्लील अंगविक्षेप केले. त्यानंतर पीडित मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी २८ जानेवारी २०२२ रोजी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आरोपी केवीन सतीश म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.राजंदेकर यांच्या न्यायालयात झाली.

सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून ॲड. स्मिता धुमाळ-पाटील यांनी काम पाहीले. सुनावणीदरम्यान १३ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. याप्रकरणी आरोपीला दोषी पकडून तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in