उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट; सिडकोच्या पाच एकर जागेवर अतिक्रमणाचा आरोप, सुरक्षेचा गंभीर प्रश्न

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदर परिसरातील सिडकोच्या सुमारे पाच एकर मोक्याच्या जमिनीवर भंगार माफियांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप होत असून, यामुळे परिसरातील सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट; सिडकोच्या पाच एकर जागेवर अतिक्रमणाचा आरोप, सुरक्षेचा गंभीर प्रश्न
उरणमध्ये भंगार माफियांचा सुळसुळाट; सिडकोच्या पाच एकर जागेवर अतिक्रमणाचा आरोप, सुरक्षेचा गंभीर प्रश्न
Published on

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदर परिसरातील सिडकोच्या सुमारे पाच एकर मोक्याच्या जमिनीवर भंगार माफियांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप होत असून, यामुळे परिसरातील सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. देशाच्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या संवेदनशील परिसरात अनधिकृत भंगार यार्ड उभारण्यात आल्याने नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, सिडकोच्या जागेवर मोठमोठे शेड उभारून भंगार व्यवसाय सुरू करण्यात आला असून, १० ते १२ बेकायदेशीर वजनकाटेही कार्यरत आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार आणि हप्तावसुली होत असल्याचा आरोप आहे. परिसरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, 'लाला' या नावाने ओळखला जाणारा एक व्यावसायिक या नेटवर्कचे संचालन करत असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासह काही परप्रांतीय व्यक्तींनीही या व्यवसायात सहभाग घेतल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

जेएनपीए बंदर, कंटेनर यार्ड, गोदामे आणि विमानतळ परिसरामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर भंगार उपलब्ध होत असल्याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेकांनी व्यवसाय थाटल्याचे चित्र आहे. चारफाटा, खोपटा पूल, नवघर, आयओटीएल परिसर तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या रस्त्यांवर आणि शासकीय भूखंडांवर अशा भंगार यार्डांचे जाळे वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी याच परिसरातील भंगार व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे या भागातील अनधिकृत भंगार व्यवसायाकडे केवळ महसुलाचा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

स्थानिकांचा आरोप आहे की, सिडकोकडून अधूनमधून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांतच ही अतिक्रमणे पुन्हा उभी राहतात.

logo
marathi.freepressjournal.in