वीटभट्टी, हॉटेलमालकांना मतदानाबाबत जागृत करण्याचे आवाहन
@ANI

वीटभट्टी, हॉटेलमालकांना मतदानाबाबत जागृत करण्याचे आवाहन

मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी या मजुरांना सुट्टी द्यावी किंवा त्यांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत सोडण्याची आणि आणण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन तहसीलदार तानाजीज शेजाळ यांनी केले. वीटभट्टी मजूर मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी तहसीलदारांनी हे आवाहन केले

पेण : रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निमित्ताने सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर पेण विधानसभा मतदारसंघांमध्ये सहायक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तालुक्यातील वीटभट्टी मालक-चालक तसेच हॉटेल व्यावसायिकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी तहसीलदारांनी दोन महत्त्वाचे आवाहन केले. या आवाहनांना कसा प्रतिसाद मिळेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी या मजुरांना सुट्टी द्यावी किंवा त्यांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत सोडण्याची आणि आणण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन तहसीलदार तानाजीज शेजाळ यांनी केले. वीटभट्टी मजूर मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी तहसीलदारांनी हे आवाहन केले

वीटभट्टीप्रमाणेच पेण तालुक्यातील हॉटेलांमध्ये शेकडो कामगार आहेत. त्यांनाही मतदानाच्या दिवशी हॉटेल व्यावसायिकांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि त्यांना सुट्टी द्यावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले. एवढेच नाही तर मतदानांचा टक्का वाढवण्यासाठी मतदान केलेल्या ग्राहकांना त्या दिवशी बिलामध्ये १० टक्के सूट देण्याचेही आवाहन केले. त्यासाठी हॉटेलमध्ये फलक लावण्याचीही सूचना केली.

विशेष म्हणजे वीटभट्टी मालक आणि हॉटेल व्यावसायिकांनीही तहसीलदारांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन पातळीवर विविध स्तरावर बैठका घेऊन, जनजागृती करून प्रयत्न होत आहे. आता पेण तालुक्यातील वीटभट्टीमालक तसेच हॉट्लमालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in