पाच वर्षीय मुलीसोबत वृद्धाचे अश्लील चाळे

पनवेल भागातील घरगुती डे-केअरमध्ये जाणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीसोबत घरातील ७८ वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पाच वर्षीय मुलीसोबत वृद्धाचे अश्लील चाळे
Published on

नवी मुंबई : पनवेल भागातील घरगुती डे-केअरमध्ये जाणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीसोबत घरातील ७८ वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणातील आरोपी ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीची सून त्यांच्या घरामध्ये घरगुती डे-केअर चालवते. तसेच त्यांची सून आपल्या घरामध्ये खासगी शिकवणी सुद्धा घेते. याच डे-केअरमध्ये पनवेल येथे राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यांची ५ वर्षीय मुलगी व ३ वर्षाचा मुलगा हे दोघे येत असत. गत महिन्यामध्ये डॉक्टर दाम्पत्याला दोन दिवस रात्रपाळी असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना रात्रीच्या सुमारास या डे-केअरमध्ये ठेवले होते.

रात्रीच्या वेळेस घरातील वृद्ध व्यक्तीने डॉक्टरच्या ५ वर्षीय पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पीडित मुलीकडे सखोल विचारपूस केल्यानंतर नानुने तिच्यासोबत रात्रीच्या वेळी दोन वेळा अश्लील चाळे केल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टर दाम्पत्याने याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in