अपोलोत टीएव्हीआय प्रक्रिया यशस्वी; पहिल्यांदा दोन ज्येष्ठ रुग्णांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

डॉ. राहुल गुप्ता, कार्डिओलॉजी-वरिष्ठ सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,"नवी मुंबई येथे अशा प्रकारच्या पहिल्याच प्रकरणामध्ये डोंबिवलीच्या ७० वर्षे वयाच्या महिलेला ईआरमध्ये आणले गेले जिला श्वास घेण्यात खूप त्रास होत होता, रक्तदाब फार कमी होता
अपोलोत टीएव्हीआय प्रक्रिया यशस्वी; पहिल्यांदा दोन ज्येष्ठ रुग्णांच्या हृदयावर शस्त्रक्रिया
Published on

नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई (एएचएनएम) येथे दोन वरिष्ठ रुग्णांवर जटिल टीएव्हीआय प्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. जटिल मेडिकल उपचारांच्या दरम्यान एका ९१ वर्षे वयाच्या पुरुषावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, तर दुसरीकडे एक ७० वर्षे वयाच्या महिलेला हृदयक्रिया बंद पडल्याने अनेक अंगे निकामी होण्याच्या अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. अपोलोच्या आरोग्य सेवा टीम्सच्या दृढनिश्चयी कामांमुळे दोघाही रुग्णांना जणू नवीन जन्म मिळाला. अतिशय जटिल अशा ट्रांस केथेटर एओर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) प्रक्रियेमध्ये दोघाही रुग्णांच्या हृदयातील व्हॉल्व बदलले गेले. 'टीएव्हीआय' ची शस्त्रक्रिया पहिल्यांदा अशा रुग्णावर करण्यात आली ज्याला त्याचवेळी सीपीआर देण्यात येत होते, यामुळे हृदयरोगांसाठी उपचाराचे नवीन मानक अपोलोने स्थापित केले.

डॉ. राहुल गुप्ता, कार्डिओलॉजी-वरिष्ठ सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी सांगितले,"नवी मुंबई येथे अशा प्रकारच्या पहिल्याच प्रकरणामध्ये डोंबिवलीच्या ७० वर्षे वयाच्या महिलेला ईआरमध्ये आणले गेले जिला श्वास घेण्यात खूप त्रास होत होता, रक्तदाब फार कमी होता, ऑक्सिजन सॅच्युरेशन फार कमी होते, शरीरातील अनेक अंगे निकामी होत होती, तिची हृदयक्रिया बंद पडत होती ज्यामुळे तिला सीपीआर आणि डीफिब्रिलेशनची गरज होती. चाचण्यांमध्ये कळले की तिचा एओर्टिक स्टेनोसिस फार गंभीर होता. रुग्णाच्या अशा गंभीर परिस्थितीमुळे आणि पारंपारिक ओपन-हार्ट शस्त्रक्रिया करणे योग्य नसल्यामुळे तिचा जीव वाचवण्यासाठी आणीबाणीमध्ये ट्रांस केथेटर एओर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) प्रक्रिया करण्यात आली.

ही प्रक्रिया करत असताना रुग्णाला इनट्यूबेशन करून वाऱ्याचा प्रवाह सुरू ठेवला गेला, तसेच हृदयक्रिया बंद पडलेली असल्यामुळे सतत सीपीआर देणे सुरू होतेच. कोरोनरी धमनीमध्ये अडथळा येऊन गुंतागुंतीत भर पडण्याचा धोका असल्यामुळे आम्ही टीएव्हीआय प्रक्रिया करत असताना चिमनी स्टेंटिंग नावाच्या एका विशेष तंत्राचा वापर केला (धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी).

७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अनेक रुग्णांना एओर्टिक स्टेनोसिस हा आजार असतो, पण याचे निदान झालेले नसते. वरिष्ठ रुग्णांमध्ये श्वास घेण्यास एकसारखा त्रास होणे, चक्कर येणे, छातीत अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे आणि पाय सुजणे ही वय वाढल्याची लक्षणे मानली जातात. शहरी भागांमध्ये सीव्हीडी हा मोठ्या चिंतेचा विषय आहे त्यामुळे ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वच लोकांनी नियमितपणे तपासण्या करून स्वतःच्या हृदयाचे आरोग्य समजून घेतले पाहिजे.

- डॉ. महेश घोगरे, कार्डिओलॉजी-सल्लागार, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई

या प्रवासाला चमत्काराशिवाय दुसरे नाव देता येणार नाही. हृदयक्रिया बंद पडल्याच्या अंधार कोठडीतून नवीन आशेचे किरण दाखवण्यासाठी मी अतिशय कुशल आणि कनवाळू असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सच्या अविश्वसनीय अशा टीमचा नेहमी आभारी राहीन. माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका मला आठवण करून देतो की आयुष्य किती बहुमोल आहे आणि चिकाटीची ताकद किती आहे.

- गोविंद गाडेकर (रुग्ण)

logo
marathi.freepressjournal.in