एनएमएमटी बसचालकाला मारहाण करणारा अटकेत

एनएमएमटी बस इनोव्हा कारला घासल्याने संतप्त झालेल्या इनोव्हा कारचालकाने एनएमएमटी बसचालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली होती...
एनएमएमटी बसचालकाला मारहाण करणारा अटकेत

नवी मुंबई : वाहतुकीच्या ओघात एनएमएमटी बस इनोव्हा कारला घासल्याने संतप्त झालेल्या इनोव्हा कारचालकाने एनएमएमटी बसचालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कोपरखैरणेतील डी-मार्ट येथील चौकात घडली. या घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी एनएमएमटी बसचालकाला मारहाण करणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला नोटीस बजावून सोडून देण्यात आले.

शुक्रवारी वाशी ते मुंब्रा या मार्गावरील ८४ क्रमांकाच्या बसवर भाऊसाहेब खेडकर (३४) कार्यरत होता. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याची बस कोपरखैरणेतील डी-मार्ट येथील चौकातील सिग्नलवरून सुटल्यानंतर एनएमएमटी बस इनोव्हा कारला किरकोळ घासली गेली. यावरून कारचालक सुनील कोंढाळकर (४०) याने एनएमएमटी बसचालकासोबत वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत बसचालक भाऊसाहेब खेडकर जखमी झाला. या घटनेनंतर एनएमएमटी बसचालकाने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारचालक सुनील कोंढाळकरला अटक केली. त्यानंतर नोटीस बजावून त्याची सुटका करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in