अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासात ढिलाई; सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी तपासात ढिलाई केली. त्यामुळे...
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासात ढिलाई; सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तीवाद
Published on

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी तपासात ढिलाई केली. त्यामुळे या प्रकरणात लवकर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची ही ढिलाई अप्रत्यक्ष आरोपींना मदत करण्यासाठीच होती. पोलीस तपास करीत नसल्यामुळे अश्विनी ब्रिदे यांच्या नातेवाईकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पनवेल जिल्हा न्यायालयात केला.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर वकिलांचा अंतिम युक्तिवाद सुरू आहे. सुरुवातीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे युक्तीवाद करीत आहेत. नुकत्याच झालेल्या तारखेला युक्तीवाद करताना त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

logo
marathi.freepressjournal.in