नवी मुंबईत पोलिसांवर हल्ला ; ४० जण ताब्यात

मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे.
नवी मुंबईत पोलिसांवर हल्ला ; ४० जण ताब्यात

नवी मुंबई : नवी मुंबईतील ट्रक-ट्रेलर व डंपरचालकांनी मोटार वाहन कायद्यातील सुधारणांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच ४० ते ५० ट्रक-ट्रेलर व डंपरचालकांनी बांबू, लाठ्याकाठ्या व दगडाच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांची अधिक कुमक मागवून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तसेच आंदोलन करणाऱ्या ४० लोकांची धरपकड करण्यात आली.

नवी मुंबईत हिंसक वळण

सकाळी उरण जेएनपीटी मार्गावर वाहतूककोंडी झाल्याने एनआरआय पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक व तीन अंमलदार चक्काजाम करणाऱ्या आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी आंदोलकांनी पोलिसांवरच लाठीकाठी, बांबू व दगडाच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासगी वाहनांवर दगडफेक व लाठ्याकाठ्या मारून त्यांचे नुकसान केले. या आंदोलनामुळे उरण जेएनपीटी मार्गावर सकाळी सुमारे २ तासांपेक्षा अधिक काळ वाहतूककोंडी झाली होती.

जुलमी नवा मोटार वाहन कायदा रद्द करावा -नाना पटोले

मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या कायद्याविरोधात वाहनचालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. वाहनचालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

या कायद्यामुळे स्वत:चे वाहन चालवण्यासही लोकांना भीती वाटत आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास १-२ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपयांचा दंड होता, पण नवीन कायद्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षा व ७ ते १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हा कायदा अजामीनपात्र आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in