बदलापूर : कोंडेश्वर धबधब्यात बुडून कोपरखैरणेच्या तरुणाचा मृत्यू

गुरुवारी सकाळी कोंडेश्वर येथे जात असल्याचे सांगून अनुप तीन मित्रांसह घरातून निघाला होता.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

बदलापूर : बदलापूरजवळील कोंडेश्वर धबधब्यात बुडून एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनुप मिश्रा असे या तरुणाचे नाव असून नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत होता.

गुरुवारी सकाळी कोंडेश्वर येथे जात असल्याचे सांगून अनुप तीन मित्रांसह घरातून निघाला होता. सकाळी दर्शन झाल्यानंतर तो मित्रांसह घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र तेथील धबधबा पाहून त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे ८.३० वा. च्या सुमारास अनुप व त्याचे मित्र धबधब्यातील कुंडातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनुप बुडाला.

अनुप हा गरीब कुटुंबातील तरुण असून अलीकडेच त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. अनुपच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in