पनवेल महानगरपालिकेतील विकासकामांचे भूमिपूजन

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे असणार आहेत.
पनवेल महानगरपालिकेतील विकासकामांचे भूमिपूजन
Published on

पनवेल : महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता राज्याचे उद्योग व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे असणार आहेत. कळंबोली मधील सेक्टर ११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे होणाऱ्या या समारंभास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकाम', 'खारघर नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनपृष्ठीकरण', 'कळंबोली नोडमधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनपृष्ठीकरण', 'महानगरपालिका मुख्यालय लगतच्या रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व उन्नतीकरण', 'पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण', मल प्रक्रिया केंद्र ' या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in