घणसोलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बेलापूर येथून ठाण्याच्या दिशने जाणाऱ्या भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गत १ फेब्रुवारी रोजी रात्री घणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर घडली.
घणसोलीत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नवी मुंबई : बेलापूर येथून ठाण्याच्या दिशने जाणाऱ्या भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गत १ फेब्रुवारी रोजी रात्री घणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलावर घडली. या अपघातानंतर ट्रकचालकाने अपघाताची माहिती न देता पलायन केले असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सदर ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे. या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सुधीर शिवशंकर शिवशरण उर्फ पिंटु (२७) असे असून तो घणसोलीतील तळवली नाका येथे कुटुंबासह राहत होता. गत १ फेब्रुवारी रोजी सुधीर हा आपल्या मोटारसायकलवरून घरी जात होता. यावेळी त्याची मोटारसायकल घणसोली रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपुलावर आली असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सुधीरच्या मोटारसायकलला धडक दिली.

logo
marathi.freepressjournal.in