भाजप सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले की, देशाचा विकास महत्वाचा आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारताची एक मजबूत, न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार झाली असून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे.
भाजप सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल : 'सत्ता असो कि नसो' सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून काम करणारा भारतीय जनता पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी केले. भारतीय जनता पक्षाचा ४५ वा स्थापना पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे म्हंटले की, देशाचा विकास महत्वाचा आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण जगात भारताची एक मजबूत, न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार झाली असून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी देशात विकासाची मुहूर्तमेढ रोवली आणि तो वारसा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी पुढे नेत देशाला विकासात्मक चेहरा दिला आहे. जगात सर्वात जास्त सदस्य असेलला हा पक्ष आणि सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र विधायक कार्याला प्रेरणा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच अनेकांनी आपले आयुष्य पक्षासाठी वेचले आहेत असे अधोरेखित करून त्यांच्याप्रती आदरभावना व्यक्त करतानाच त्यांनी स्थापना दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in