पनवेलमध्ये भाजपचे 'गाव चलो अभियान'

भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत
पनवेलमध्ये भाजपचे 'गाव चलो अभियान'

पनवेल : भाजपतर्फे ११ फेब्रुवारीपर्यंत व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरू करण्यात आले आहे. यात भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारी योजनेतील लाभार्थी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, भाजप जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेवाव्रत हे भाजपचा मूळ अंग असून मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रकेही यावेळी वितरित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या अंतर्गत ५० हजार युनिट्समध्ये भाजपचे ५० हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना ३२ हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in