
मुंबई : कळंबोली रेल्वे फ्लाय-ओव्हरवर ओपन वेब गर्डरच्या कामासाठी चार दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी मध्यरात्री हा ब्लॉक घेतला आहे. यामुळे अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावणार आहेत.
ओपन वेब गर्डरच्या लाँचिंगसाठी रविवार ११ मे, मंगळवार १३ मे, बुधवार १४ मे, शुक्रवार १६ मे रोजी कळंबोली येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. गर्डर लॉचिंग रविवारी रात्री १.२० ते ४.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस सोमटने येथे २.५८ तास ते ४.३० तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल. तर ट्रेन क्रमांक २०११२ मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ४.०२ तास ते ४.५० तासांपर्यंत पनवेल येथे नियमित केली जाईल.
ट्रेन क्रमांक १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५० मिनिटांनी सुटेल. ट्रेन क्रमांक २२१९३ दौंड - ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस कर्जत - कल्याण - भिवंडी रोड मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबा दिला जाईल. दुसरा ब्लॉक मंगळवारी मध्यरात्री घेतला आहे. रात्री १.२० ते ४.२० या वेळेत हा ब्लॉक असेल. या कालावधीत अनेक गाड्यांचे नियमन करण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस सोमटने येथे २.५८ तास ते ४.१० तासांपर्यंत नियंत्रित केली जाईल. ट्रेन क्रमांक २०११२ मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ४.०२ तास ते ४.२० तासांपर्यंत पनवेल येथे नियंत्रित केली जाईल. तिसरा ब्लॉक बुधवार १४ मे रोजी घेण्यात आला आहे. या कालावधीत ट्रेन क्रमांक २२६५५ एरणाकुलम जंक्शन- हजरत निजामुद्दीन अतिजलद एक्स्प्रेस पनवेल येथे रात्री २.५० ते पहाटे ४ वाजेपर्यंत नियंत्रित केली जाईल.
ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलूरू जंक्शन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस २.५८ तास ते ३.५० तासांपर्यंत आपटा येथे नियंत्रित केली जाईल.
चौथा ब्लॉक १६ मे रोजी रात्री २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत असेल. या कालावधीत ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलूरू जंक्शन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस रात्री ३.११ ते ४.०० वाजेपर्यंत आपटा येथे नियमित केली जाईल.