नवी मुंबईत बिल्डरची हत्या

उलवे भागात राहणारे बिल्डर मनोज सिंग यांची सीवूड सेक्टर-४४ मधील त्यांच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
नवी मुंबईत बिल्डरची हत्या

नवी मुंबई : उलवे भागात राहणारे बिल्डर मनोज सिंग यांची सीवूड सेक्टर-४४ मधील त्यांच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता दोन मुली त्यांच्या कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची हत्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मनोज सिंग यांची अमन डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. त्यांचे उलवे परिसरात काही इमारतीचे काम सुरू होते. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता मनोज सिंग यांनी आपल्या पत्नीला फोन केला. कार्यालयात काही व्यक्ती येत असल्यामुळे मला घरी येण्यास उशीर होत असल्याचे सांगितले. जास्त उशीर झाल्यास रात्री कार्यालयातच झोपणार असल्याचे सिंग यांनी पत्नीला सांगितले होते. यादरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरा मनोज यांना भेटायला आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडुन त्याची हत्या करुन केली. सिंग याला धमकीचे फोन येत आल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in