बेलापूरमध्ये इमारतीत आग; अग्निशमन दलाचे जवान जखमी

शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी सकाळी ११च्या सुमारास सीबीडी सेक्टर- ११ मधील कुकरेजा टॉवरमधील मीटर रूममध्ये आग लागली.
बेलापूरमध्ये इमारतीत आग; अग्निशमन दलाचे जवान जखमी

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर सेक्टर ११ मधील कुकरेजा टॉवर या इमारतीच्या मुख्य मीटर रूममध्ये सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुर पसरल्याने अनेकजण या इमारतीत अडकून पडले होते. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना इमारतीच्या बाहेर काढून येथील आग आटोक्यात आणली. या इमारतीमध्ये कोंडलेला धूर बाहेर काढण्यासाठी इमारतीच्या काचा फोडताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे सोमवारी सकाळी ११च्या सुमारास सीबीडी सेक्टर- ११ मधील कुकरेजा टॉवरमधील मीटर रूममध्ये आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या सीबीडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन येथील आग आटोक्यात आणण्याबरोबरच आगीमुळे संपुर्ण इमारतीत पसरलेला धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना कुखरुप बाहेर काढले. यावेळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या काचा फोडून इमारतीत कोंडलेला धूर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांना काचा लागल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बेलापूर येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in