मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बसचा अपघात; बसचालकाचा मृत्यू तर १९ प्रवासी जखमी

मृत एसटीचालकाचे नाव अभिमन्यू अच्युत गायके असे असून तो मूळचा उस्मानाबाद येथील होता.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बसचा अपघात; बसचालकाचा मृत्यू तर १९ प्रवासी जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी सोलापूर-अर्नाळा एसटी बस धडकल्याने झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा मृत्यू, तर बसमधील १९ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील कोन गावाजवळ घडली. या अपघातातील सर्व जखमींना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रेलर चालक तसेच मृत एसटी चालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातातील मृत एसटीचालकाचे नाव अभिमन्यू अच्युत गायके असे असून तो मूळचा उस्मानाबाद येथील होता.

शुक्रवारी रात्री एसटीचालक अभिमन्यू गायके हा सोलापूर-अर्नाळा (विरार) ही बस घेऊन मुंबईच्या दिशेने येत होता. बसमधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले असून त्यातील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in