फेक अ‍ॅक्सिडंट : व्यावसायिकाची कार अडवून १२ लाख ४३ हजाराची रक्कम लंपास

अज्ञात चौकडीने अपघाताचा बनाव करून एका व्यावसायिकाची कार जुईनगर येथे अडवून त्याच्या कारमधील तब्बल १२ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना
फेक अ‍ॅक्सिडंट : व्यावसायिकाची कार अडवून १२ लाख ४३ हजाराची रक्कम लंपास
Published on

नवी मुंबई : अज्ञात चौकडीने अपघाताचा बनाव करून एका व्यावसायिकाची कार जुईनगर येथे अडवून त्याच्या कारमधील तब्बल १२ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी या चौकडीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

खारघर येथे राहणारा ग्रीमसन नाडर (३३) हा व्यावसायिक खारघर येथे राहण्यास असून तो गत शनिवारी एपीएमसी मार्केट येथून १२ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कारने खारघर येथे जात होता. यावेळी त्याची कार जुईनगर येथील स्कायवॉक जवळ आली असताना, अज्ञात चौकडीने त्यांच्या कारला पाठीमागून धडक देऊन अपघात झाल्याचा बनाव रचून त्याची दिशाभूल केली. त्यांनतर सदर चौकडीने नाडरसोबत वाद घालून भांडण काढले. याचवेळी चौकडीने नाडरच्या कारची काच फोडून कारमध्ये त्याने ठेवलेली १२ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी नाडरने नेरूळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in