नवी मुंबई : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात; वाशी पुलावर उभ्या असलेल्या डम्परला जोरदार धडक; तिघांचा मृत्यू

अपघातातील मृत कडगेंची हे दाम्पत्य पुण्यातील बिबवेवाडी येथे राहण्यास होते. कडगेंची यांची मुलगी मुंबईत राहण्यास असल्याने मुलीला भेटण्यासाठी पती पत्नी मध्यरात्री पुण्याहून खासगी कारने मुंबईत येत होते.
नवी मुंबई : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात; वाशी पुलावर उभ्या असलेल्या डम्परला जोरदार धडक; तिघांचा मृत्यू
Published on

नवी मुंबई : पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी भरधाव इर्टीगा कार सायन पनवेल मार्गावरील वाशी खाडीपुलावर उभ्या असलेल्या डम्परवर धडकल्याने झालेल्या अपघातात इर्टीगा कारचालक तसेच वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघातानंतर वाशी पोलिसांनी निष्काळजीपणे वाशी खाडी पुलावर डम्पर उभा करणाऱ्या डम्परचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात मृत झालेल्यामध्ये चंद्रकांत कडगेंची (६७) व त्यांची पत्नी शिला चद्रकांत कडगेंची (६२) व कारचालक गणेश उदयसिंग भोसले (३०) या तिघांचा समावेश आहे. या अपघातातील मृत कडगेंची दाम्पत्य पुण्यातील बिबवेवाडी येथे राहण्यास होते. कडगेंची यांची मुलगी मुंबईत राहण्यास असल्याने मुलीला भेटण्यासाठी कडगेंची पती पत्नी गुरुवारी मध्यरात्री पुण्याहून खासगी कारने मुंबईत येत होते. पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या डम्परने कारला जोरदार धडक दिली.

logo
marathi.freepressjournal.in