विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल; पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड

आपल्या ८ वर्षीय मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली फेकून देत स्वत:देखील इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करणाऱ्या पनवेल पळस्पे येथील मैथिली दुआ (३८) या विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे व त्यामुळे होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल; पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याचे उघड
Published on

पनवेल : आपल्या ८ वर्षीय मुलीला २९ व्या मजल्यावरून खाली फेकून देत स्वत:देखील इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करणाऱ्या पनवेल पळस्पे येथील मैथिली दुआ (३८) या विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे व त्यामुळे होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल शहर पोलिसांनी मृत मैथिलीचा पती आशिष दुआविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील मृत मैथिली दुआ (३८) ही पती आशिष दुआ (४१) व मुलगी मायरा (८) यांच्यासह पनवेलमधील पळस्पे येथील मॅरेथॉन नेक्सॉन गृहनिर्माण संकुलातील ऑरा इमारतीत राहत होती. सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असलेला आशिष दुआ आणि मैथिली यांचा २०१२ मध्ये या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. गत बुधवारी मैथिलीने मुलगी मायरासह आत्महत्या केली.

या घटनेनंतर आशिष दुआचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबध असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तो मैथिलीला व मुलीला घरातून निघून जाण्यास तसेच त्यांना जीव देण्यास प्रवृत्त करत असे. अन्यथा तो दोघींनाही मारून टाकण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे मृत मैथिलीची आई नीता देवराईकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

त्यानुसार पोलिसांनी आशिष दुआविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्या विरोधात पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in